
आजकाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल फोनचा वापर करतात. एवढेच नव्हे तर रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतरही लोक फोनचा वापर करतात. तर जाणून घेऊयात सकाळी झोपेतून उठल्या उठल्या लगेच मोबाइल पाहण्याचे गंभीर दुष्परिणाम.

– सकाळी झोपेतून उठल्यावर सर्वातआधी मोबाईल चेक करणे आणि होऊन गेलेल्या गोष्टींचा विचार करणे यामुळे येणाऱ्या दिवसात आपल्या आपली एकाग्रता कमी झालेली जाणवते. एकाग्रता कमी झाल्याने दिवसभरातील आपण जी कामे करतो, जसे की ड्रायव्हिंगपासून ते थेट ऑफिसमध्ये काम करण्यापर्यंतच्या कामात आपल्याला एकाग्रतेची कमी जाणवते.
सकळी उठल्या उठल्या मोबाईलचा भरपूर वापर होतो आणि त्याच स्थितीत बराच वेळ बसून काम करतात. त्यामुळे डोके आणि मान दुखण्याची शक्यता वाढते. २० ते ४० वयोगटातील व्यक्तींमध्ये मणक्याशी संबंधित समस्या अधिक दिसून येत आहे.
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे असते. परंतु जे लोक सकाळी सर्वातआधी त्यांचा फोन तपासतात त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेवरही नकारात्मक परिणाम होतो. वास्तविक, फोन स्क्रीनमधून निघणारे रेज मेलाटोनिन हार्मोन्सच्या उत्पादनात अडथळा निर्माण करतात. हा हार्मोन झोपेचे नियमन करण्यास मदत करतो. सकाळी जर आपण फोन प्रथम तपासल्याने आपल्याला या प्रकाशात जास्त घालवल्याने रात्री उशिरा झोप लागणे कठीण होऊन बसते.
– जे लोक सकाळी सर्वात आधी त्यांचा मोबाईल फोन तपासतात ते नोटिफिकेशन्स, ईमेल्स किंवा सोशल मीडिया अपडेट्समधील अनेक मेसेजेसमुळे अनावश्यकपणे तणावात सापडतात. अशा परिस्थितीत आपल्या मनाची नकारात्मकता वाढू शकते आणि त्यामुळे आपण विनाकारण अस्वस्थ होऊ शकता. सकाळी झोपेतून उठल्यावर मोबाईल पाहिल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर याचा प्रभाव पडतो यामुळे दिवसाची सुरुवात खराब होऊ शकते. जेव्हा आपण सकाळी मोबाईल फोन तपासता तेव्हा आपल्याला अनेक नकारात्मक संदेश देखील मिळतात.
