
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रुंवर मात कराल. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कन्या : शासकीय कामे मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
तुळ : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
धनु : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कुंभ : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
