मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्षपदी अश्विनकुमार वागळे

कोल्हापूर : मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्ष (कोल्हापूर, सातारा) पदी अश्विनकुमार वागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नुकतीच मराठा सेवा संघ केंद्रीय कार्यकारिणीची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडली. बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या नूतन कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली.अभियंता अश्विनकुमार वागळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली. मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजिनिअर विजय घोगरे यांच्या हस्ते वागळे यांना नियुक्तीपत्र नियुक्ती पत्र देण्यात आले .

या बैठकीस मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेकर, संस्थापक सचिव रिटायर्ड आयएस निर्मल कुमार देशमुख, माजी प्रदेश कार्याध्यक्ष प्राचार्य तनपुरे , प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, प्रदेश महासचिव चंद्रशेखर शिखरे यांच्यासह महाराष्ट्रभरातून मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व इतर 32 कक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706