सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळली

मुंबई : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात सकाळी एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर बसमधून प्रवास करणारे 22 जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, बस सप्तशृंगीगडावरून खामगावच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच सप्तशृंगी देवी ट्रस्ट, पोलिस प्रशासन, ग्रामस्थ, आपत्ती व्यवसथापन घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना वणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

🤙 8080365706