
कोल्हापूर : देशातील १८ राज्यांतील 188 जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरु आहे. महाराष्ट्र राज्याला पावसाची आतुरतेने आस लागली असताना देशातील 18 राज्यात वाढत्या पावसामुळे येथील जिल्ह्यांना अक्षरशः पुराचा तडाखा बसला आहे.

या पुरामध्ये आत्तापर्यंत 574 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.जोरदार सुरू असणाऱ्या पावसामुळे उत्तर भारतात महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या महापुरामुळे 8 हजार 644 गुरे मृत्युमुखी पडली आहेत आहेत तर 8 हजार 815 घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
