उद्धव ठाकरे यांनी सोडलेला बाण आरपार घुसला : संजय राऊत

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीस चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना मानसोपचाराची गरज असल्याचं म्हटलं आहे. तर, उद्धव ठाकरे यांनी सोडलेला बाण आरपार घुसला आहे. ही तर मिरच्यांची धुरी आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घणाघाती हल्ला चढवला आहे.

ते मीडियाशी संवाद साधत होते.जे कालपर्यंत मुख्यमंत्री होते, बॉस होते. आज त्यांची हालत काय आहे? दोन दोन उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत काम करत आहेत. हे मुख्यमंत्री त्यांना ज्युनिअर होते, त्यांच्या हाताखाली आता हे काम करत आहेत. संपूर्ण सरकार दिल्लीतून सुरू आहे. त्यामुळे फ्रस्टेशनमध्ये फडणवीस बोलत आहेत. फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर प्रचंड खाली आणला आहे. अशी टीकाच संजय राऊत यांनी केली.

🤙 8080365706