सात मंत्रिपदावर शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांचा दावा

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह एकूण ४३ मंत्री असण्याची शक्यता आहे. राज्यात आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांसह एकूण २९ मंत्री आहेत. आता आणखी १४ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यातील तब्बल सात मंत्रिपदावर शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी दावा सांगितला आहे. यासह भाजपच्या मंत्र्यांकडे असलेल्या अतिरिक्त खात्यांची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याला देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

🤙 8080365706