कोल्हापुरात भाजप विरोधात काँग्रेसची निदर्शने

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना खोट्या मानहानी खटल्यात अडकविल्याबद्दल भाजपाच्या विरोधात कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

यावेळी “मोदी सरकार चले जाव, भाजप सरकार मुर्दाबाद, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, मोदी -शहा चले जाव अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोरील परिसर दणाणून सोडला होता.काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी या आंदोलनामध्ये काँग्रेसचे बाजीराव खाडे, गोकुळचे संचालक बाजीराव खाडे, अंजना रेडेकर, महिला आघाडीच्या सरला पाटील, सुप्रिया साळोखे, काँग्रेसचे पदाधिकारी सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, शशांक बावचकर यांच्यासह अन्य पदाधिकारी ,कार्यकर्ते सहभागी झाले होते.

🤙 8080365706