बालिंगा सरपंचपदी सौ. पूजा विजय जांभळे यांची बिनविरोध निवड

बालिंगा: बालिंगा ता. करवीर येथील ग्रामपंचायतच्या नुतन सरपंचपदी सौ. पूजा विजय जांभळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मागील सरपंच सचिन माळी यांनी राजीनामा दिल्यामुळे सदर सरपंचपद रिक्त होते. सकाळी ११वाजता निवडणुकीसाठी फॉर्म भरणे चालू होते परंतु सदर पूजा विजय जांभळे यांचा एकमेव अर्ज दाखल झालेमुळे निवडणूक अधिकारी बालिंगा मंडळचे सर्कल श्री अनिल काटकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आलेचे जाहीर केले. सदर सरपंचपदी पूजा जांभळे यांची बिनविरोध निवड होताच गावात एकच जल्लोष करण्यात आला असून गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत माजी सरपंच मयुर जांभळे सचिन माळी, उपसरपंच पंकज कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संदिप सुतार, पोर्णिमा जत्राटे, राखी भवड, नंदकुमार जांभळे हे उपस्थित होते, त्याच बरोबर, तंटामुक्त समिती अध्यक्ष अनिल पवार, श्रीकांत भवड, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, अमर जत्राटे, जनार्दन जांभळे, अजित भवड, एम.एस भवड, तलाठी किरण पाटील, कोतवाल रघुनाथ कांबळे ,ग्राम विकास अधिकारी रमेश कारंडे इत्यादी उपस्थीत होते. त्याच्या निवडीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

🤙 8080365706