
नवी दिल्ली : राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली.

कोल्हापूरच्या सुनील मोदी यांनी ही मूळ याचिका दाखल केली होती. ती याचिका मागे घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालायने दिला. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदार निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. रमेश बैस महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. ते आपल्या अधिकारातंर्गत विधान परिषदेवर 12 आमदारांची नियुक्ती करु शकतात. खरंतर हा भगतसिंह कोश्यारी यांच्यावेळचा विषय आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने 12 आमदारांच्या नावाची यादी कोश्यारी यांना दिली होती. पण राज्यपालांनी या आमदारांची नियुक्ती केली नाही.
