
मुंबई : राजधानी दिल्ली काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे 12 बडे नेते दिल्लीत गेले आहेत.

या बैठकीत काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांवर आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.महाराष्ट्रातील बडे नेते या बैठकीसाठी दिल्लीत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर हे नेते बैठकीसाठी दिल्लीत आहेत.
