केंद्रीय व सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोल्हापूर दौरा यशस्वी करा: उत्तम कांबळे

कोल्हापूर : रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश संघटक सचिव प्रा.शहाजी कांबळे सर यांच्या वडिलांचे गेल्या आठवड्या मध्ये निधन झाले. प्रा.शहाजी कांबळे सर व त्यांच्या कुटुंबींयांचे सांत्वन करण्यासाठी व त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब हे शुक्रवार दिनांक-14-7-2023 रोजी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. तो दौरा यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे (दादा)यांच्या अध्यक्षतेखाली बावडा रेस्ट हाऊस कोल्हापूर येथे बैठकीचे आयोजन केले होते.

जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) यांनी केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.

यावेळी RPI प्रदेश सचिव मंगलराव माळगे साहेब.यांनी हि बैठकीस मार्गदर्शन केले.तसेच यावेळी सर्व तालुका अध्यक्ष व सर्व आघाडी प्रमुख तसेच प्रमुख पदाधिकारी यांनी दौरा यशस्वी करू असे सांगितले. या बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706