कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांची स्थिती चिंताजनक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, तुळशी, वारणा, दुधगंगा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ आणि कोदे असे 15 प्रकल्प आहेत. सर्व प्रकल्पांची पाणी क्षमता 91.81 टीएमसी इतकी आहे. मात्र 10 जुलै सकाळी सातपर्यंत केवळ 30 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांची स्थिती चिंताजनक असल्याचा समोर येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण छोटे-मोठे मिळून 15 धरणे आहेत. यामधील केवळ चंदगड तालुक्यातील घटप्रभा आणि गगनबावडा तालुक्यातील कोदे धरणाचा अपवाद सोडल्यास सर्वच धरणांची पाणीपातळी खालावली आहे. केवळ घटप्रभा आणि कोदे लघू प्रकल्प भरला आहे. उर्वरित 11 धरणांमध्ये सरासरी 35 टक्केच्या आसपास पाणीसाठा आहे. काळम्मावाडी धरणात केवळ 14.65 टक्के पाणीसाठा आहे. वारणा धरणाची पाणीक्षमता 34.399 टीएमसी इतकी आहे. सध्या जिल्ह्यात वारणा धरणासह मिळून केवळ 30 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच दिवशी (10 जुलै) हाच पाणीसाठा जवळपास निम्म्यावर म्हणजेच 44.89 टीएमसी इतका आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास 15 टीएमसी कमी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील घटप्रभा प्रकल्प दोन दिवसांपूर्वी भरला होतास, तर कोदे बंधारे प्रकल्प शनिवारी रात्री अकराच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरला. या दोन प्रकल्पांचा अपवाद वगळल्यास सर्वच धरणांमध्ये पाणी पातळी खालावलेली आहे.

🤙 8080365706