सांगलीत महिला पोलिसावर अत्याचार….

सांगली : लग्नाचे आमिष दाखवून सहकारी महिला पोलिसावर अत्याचार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलिसाशी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर महिला पोलिसाचा गर्भपातही केला. याप्रकरणी सांगली पोलीस दलातील बँड पथकातील संशयित वसीम ऐनापुरेला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिला सांगली पोलीस दलात कार्यरत आहे. सांगली पोलीस बँड पथकातील वसीम ऐनापुरेसोबत तिची ओळख होती. महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार करून धमकी देणाऱ्या ऐनापुरेविरोधात फिर्याद दाखल होताच त्याला अटक करण्यात आली.

🤙 8080365706