निष्ठावंत आणि प्रामाणिक शिवसैनिकाला संधी देण्याची मागणी

कोल्हापूर: येथील शिवसेनेची आजवरची परंपरा पाहता कोणताही उसना उमेदवार आगामी लोकसभेसाठी न देता निष्ठावंत आणि प्रामाणिक शिवसैनिकाला संधी द्यावी, असाच सूर पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात आळवण्यात आला. कोल्हापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला.

यावेळी ठाकरे गटाचे उपनेते संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पक्ष बांधणीचे आवाहन केले. धोका दिलेल्यांचा बदला घ्यायचा असून पक्ष तळागाळात पोहोचवा. पक्ष बांधणीचे काम मजबूत करा, असे आवाहन त्यांनी केले. जुलैच्या पंधरवड्यानंतर उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमी पक्षाच्या माजी आमदारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी लोकसभेला शिवसैनिकाला संधी देण्याचे आवाहन केले.

🤙 8080365706