
पुणे: राज्यात सरासरीपेक्षा सुमारे 27 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यातच आता आणखीन एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या मोसमी पावसावर एल निनोचं सावट आहे.
प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती निर्माण झाली आहे. एल निनो स्थितीमुळे मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. मात्र दीर्घकालीन अंदाजानुसार सरासरी इतक्याच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पेरण्याला उशीर दरम्यान यंदा राज्यात मान्सूनचं आगमन उशिरानं झाल्यानं पेरण्या देखील लांबल्या. सामान्यपणे जूनमध्ये पेरणीची कामे पूर्ण होतात. मात्र यंदा बहुतांश पेरण्या या जुलैमध्ये झाल्या आहेत. त्यातच आता हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जर पावसाने ओढ दिली तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
