पश्चिम बंगाल मध्ये हिंसाचार

मुबंई : पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरु असून यामध्ये हिंसाचार झाल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम बंगाल राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडल्याचे समोर येत आहेत.

मतदानादरम्यान काही ठिकाणी गोळीबार, तर काही ठिकाणी स्फोट करण्यात आला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायतीच्या ७४ हजार जागांसाठी शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरु आहे. काही ठिकाणी शांततेत मतदान सुरु आहे. तर काही ठिकाणी हिंसाचार सुरु आहे. 

🤙 8080365706