कला केंद्राच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय

बीड : ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या वरदहस्ताने बीडमध्ये कला केंद्राच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

पोलिसांनी कला केंद्रावर छापा टाकून ५ अल्पवयीन मुलींसह काही महिलांची सुटका केली आहे.आयपीएस पंकज कुमावत यांच्यासह टीमने या सर्व प्रकाराचा पर्दाफाश केला असून याप्रकरणात 36 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नाकर शिंदे असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कलाकेंद्राच्या अड्ड्यावर जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची स्कॉर्पिओ आणि इनोव्हा दोन्ही गाड्या मिळून आल्या आहेत. या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

🤙 8080365706