महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ‘एक सही संतापाची’ उपक्रम

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ‘एक सही संतापाची’ हा उपक्रम सुरु केला आहे. पुणे शहरात मनसेची सह्यांची मोहीम सुरु केली आहे.

मतदारांच्या मताला विचारात घेतलं जात नाही, एका चिन्हावर निवडून येतात आणि दुसरीकडे जाताय, आम्ही आमचा संताप सहीतून व्यक्त करतोय, असा हा उपक्रम आहे. मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पुणे शहरात या उपक्रमास सुरुवात केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘एक सही संतापाची’ या मोहीमेला प्रारंभ सोलापूर जिल्ह्यात झाला. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरातून या मोहिमेला सुरुवात झाली. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत मोहिमेला प्रारंभ झाला आहे. राजकारणाचा चिखल झाला आहे का? माझ्या मताला काही किंमत नाही का? एकदा मतदान केलं की तुम्हाला पाच वर्षे गृहीत धरणार का? या घटनांचा तुम्हाला राग येत नाही का? यासह विविध प्रश्न विचारत सहीच्या मोहिमेला प्रारंभ झाला आहे.

🤙 8080365706