शरद पवार यांनी मान्य केला ‘तो’ आरोप

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अनेक आरोप केले. त्यापैकी अजित पवार यांनी केलेला सर्वात मोठा आरोप खुद्द शरद पवार यांनीच मान्य केला आहेत. 

2014, 2017 आणि 2019 मध्ये शरद पवार यांनी भाजपशी युती करण्यासाठी चर्चा करण्यास सुरुवात केली होती. पण तिन्हीवेळी सर्व ठरल्यानंतर त्यांनी माघार घेतली होती, असा सर्वात मोठा आरोप अजित पवार यांनी केला होता. अजित पवार यांचा हा आरोप शरद पवार यांनी मान्य केला आहे.पुढे बोलताना ते म्हणाले , मी अजून म्हातारा झालेलो नाही, असं सांगत शरद पवार यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे शब्दच ऐकवले. मी टायर्ड नाही आणि रिटायर नाही. मी अजूनही पक्षासाठी काम करत आहे. माझ्याकडे कोणतंही मंत्रीपद नाही. मला रिटायर होण्याचा सल्ला देणारे हे कोण आहेत? असा सवालच शरद पवार यानी केला. मी अजूनही काम करत आहे, असंही ते म्हणाले.

🤙 8080365706