
धामोड :(ता .राधानगरी ) येथील बाजारपेठेमध्ये गेल्या दोन दिवसापासून शंभर रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणल्या असल्याचे काही व्यापाऱ्यांना निदर्शनास आले. यामुळे सध्या व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बनावट नोटा चलनात कोणी व कशा आणल्या याची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. धामोड हे बाजारपेठेचे गाव असल्याने या गावचा परिसरातील चाळीस वाड्या -वस्त्यांशी संपर्क असतो. आज सकाळी येथील काही व्यावसायिकांच्या चलनामध्ये शंभर रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. तेव्हा काही व्यावसायिकांनी एकमेकाकडे विचारना करताच चलनात नोटा असल्याची बातमी सर्वत्र पसरली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
