जेवणानंतर चालण्याची योग्य पद्धत

तुम्हाला असिडीटी, पोटातील वात, बद्धकोष्ठता, लठ्ठपणासारख्या आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. पंरतु, तुम्हाला शरीरातील ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची असेल तर, रात्रीच्या जेवणानंतर योग्य पद्धतीने चालणे आवश्यक असते. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

चालण्यामुळे शरीरातील पचनक्रिया चांगली राहते. स्पोर्ट्स मेडिसीनने केलेल्या स्टडीनुसार, जेव्हा माणसं रात्रीच्या जेवणानंतर चालायला जातात, त्यावेळी त्यांची ब्लड शुगर लेव्हल हळूहळू वाढते आणि इन्सूलिनचं प्रमाण स्थिर राहतं. काही तज्ज्ञ सांगतात, रात्रीच्या जेवणानंतर चालल्यावर ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन चालल्यावरही शरीराला फायदा होतो. तुमच्या शरीरातील कॅलरी बर्न होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. जेवणानंतर ३० मिनिटे चालल्यावर १५० कॅलरी बर्न होऊ शकतात.

जेवणानंतर ३० मिनिटं झाल्यावर चालणे योग्य आहे, असं अनेक स्टडीमध्ये म्हटलं आहे. पण वेदिक विस्डमच्या माहितीनुसार, जेवणानंतर मोठी गॅप ठेवल्यानंतर चालायला गेल्यास जास्त फायदा होतो. आरामात श्वास घेऊन हळूहळू चालल्यावर पचनक्रिया सुधारते.

🤙 8080365706