
मुंबई : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. दरम्यान “शिवाजी अढळराव पाटील यांना चार वेळा लोकसभेची संधी देऊनही, अढळराव पाटील यांनी स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजी अढळराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने मला एकदाच उमेदवारी दिली आणि शरद पवार यांच्या अडचणीच्या काळात मी त्याच्या सोबत ठामपणे उभा आहे. हा अढळराव आणि माझ्यामधील मूलभूत फरक आहे” असं वक्तव्य शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं.“अभिनय हे माझ्या चरितार्थाच साधन आहे. अढळराव यांच्यासारखी माझी अमेरिकेत कोणतीही कंपनी नाही, हे मतदार संघातील मतदारांना माहिती आहे” अशी खोचक टीका कोल्हे यांनी केली आहे. “अभिनय हा माझा छंद आहे आणि माझे छंद चार चौघात उजळ माथ्याने सांगू शकतो, तशी परिस्थिती तुमच्या छंदा बाबत आहे का? “असा अडचणीचा प्रश्न त्यांनी अढळराव यांना विचारला आहे.
