
कोल्हापूर :कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार दि. ७ कोल्हापुरात येत आहेत. मंत्री मुश्रीफ यांचे कोल्हापुरात जल्लोषी स्वागत करूया, असा निर्धार सर्वपक्षीय प्रमुखांच्या बैठकीमध्ये करण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या ३०-३५ वर्षात लोकाभिमुख समाजकारण केले आहे. त्यांना ताकद देऊया आणि त्यांचे नेतृत्व वाढवूया. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटना कोल्हापूर जिल्ह्यात अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहनही त्यांनी केले. इचलकरंजीचे माजी नगराध्यक्ष राजाराम धारवट म्हणाले, इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही हातांनी भरभरून दिले आहे. इचलकरंजीतील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने आणि जिद्दीने काम करू. केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, कार्यकर्त्याचे महत्त्व जाणणारा आणि ते कायमपणे जपणारे नेतृत्व म्हणजे हसनसाहेब मुश्रीफ होय.
कोल्हापूर स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर म्हणाले, मंत्री हसनसाहेब मुश्रीफ हे जात -धर्म, गट -तट, पक्षीय भावना या सगळ्याच्या पलीकडचे बहुजनांचे नेतृत्व आहे. कोल्हापूरच्या संस्कृतीला साजेसे त्यांचे स्वागत करूया. केडीसीसी बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड म्हणाले, आमच्यासाठी नेता आणि पक्ष हे मंत्री हसनसाहेब मुश्रीफ आहेत. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना ताकद देऊ.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भरत पाटील- भुयेकर, उपाध्यक्ष शंकर पाटील, संचालक बी. जी. पाटील, माजी नगरसेवक रमेश पवार, ॲड. प्रकाश देसाई, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर -खेबवडे, शिरीष देसाई यांचीही यावेळी भाषणे झाली. स्वागत मनोजभाऊ फराकटे यांनी केले. प्रास्ताविक केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले.
असे नेतृत्व पुन्हा होणार नाही……
ए. वाय. पाटील म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांनी ३०-३५ वर्षात अखंडपणे गोरगरिबांची सेवा केली आहे. त्यामुळेच अल्पसंख्यांक समाजात जन्मूनही बहुजनांचे नेतृत्व, अशी त्यांची सबंध महाराष्ट्रभर ओळख झाली आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा नव्याने जन्माला येणार नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, माजी संचालक विलासराव गाताडे, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील -चुयेकर, गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ, राजेश लाटकर, रमेश पोवार, संदीप कवाळे, विकास पाटील, केडीसीसी बँकेचे माजी संचालक असिफ फरास, प्रकाश गवंडी, महेंद्र चव्हाण, जयदीप अमित गाताडे आदी प्रमुख उपस्थित होते.
