मध्यवर्ती बस स्थानकातून चेन चोरी करणारी महिला जेरबंद

कोल्हापूर : मध्यवर्ती बस स्थानक परिसरात महिलाच्या गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील महिला आरोपीला शाहूपुरी पोलिसांकडून सापळा रचून जेरबंद करण्यात आले आहे. अनघा जोशी असे त्या महिला आरोपीचे नाव आहे.

1 मे रोजी, सध्या रायगड येथे राहत असणाऱ्या वैशाली कोटगी या आपल्या मूळगावी गडहिंग्लज येथे जाण्यासाठी रायगडहुन कोल्हापुरात आल्या होत्या. यावेळी मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरीस गेली होती. याप्रकरणी त्यांनी शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास करताना शाहूपुरी पोलिसांना ही चोर मूळची रत्नागिरी येथील रहिवाशी असणारी आणि सध्या जाधववाडी येथे राहणाऱ्या अनघा जोशी या रेकॉर्डवरील महिलेने केल्याची माहिती मिळाली होती. या गुन्ह्याचा तपास करताना शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आज मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सापळा लावून आरोपी अनघा अनंत जोशी हिला आज संध्याकाळी उशिरा ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तिच्याकडून 2 गुन्हे उघडकीस आणत 2 लाख 30 हजाराचे दागिने जप्त केले आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, सहायक फौजदार संदीप जाधव, संदीप पाटील, नारायण कोरर्वी, मिलिंद बांगर, शुभम संकपाळ, लखनसिंह पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.

🤙 8080365706