कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गटात फुट ?जिल्हाप्रमुखांवर पदाधिकारी नाराज

कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांच्या नाराजीने कोल्हापुरातील उरलासुरला ठाकरे गटात फूट पडली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या विरोधात चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जाहीर नाराजी थेट मातोश्रीवर पोहोचवली आहे.

राधानगरी, आजरा, चंदगड आणि कागल तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांनी विजय देवणे यांच्या कार्यपद्धती विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागासाठी ग्रामीण जिल्हाप्रमुख द्यावा अशी मागणी केली आहे. मातोश्रीवर खोट्या बातम्या देऊन दिशाभूल केली जात असून ग्रामपंचायतीपासून ते नगरपंचायतीपर्यंत कोणत्याही निवडणुका गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. कोणतेही आंदोलन करताना त्यावेळी फक्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत तडजोडी करुन आंदोलन तिथेच संपवलं जातं. त्यामुळे स्थानिक पातळीवर केलेली शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख ही फळी व शाखा पूर्णपणे मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्याचा सहानुभूतीने विचार करण्यात यावा, असही मातोश्रीवर दिलेल्या निवेदनात म्हटल आहे. शिवसेनेत 40 आमदारांनी बंड केल्यानंतर त्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यामध्येही उमटले. कोल्हापूर जिल्ह्यातून आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी शिंदे गटाला जवळ केलं. त्यामुळ कोल्हापूर जिल्ह्यात सत्ताधारी शिंदे गटात आणि निष्ठावंत शिवसैनिक दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली. पदाधिकाऱ्यांमधील या वादावर उद्धव ठाकरे कसा तोडगा काढतात? याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिल आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे तीन जिल्हाप्रमुख आहेत. यामध्ये विजय देवणे, संजय पवार आणि ग्रामीणमध्ये मुरलीधर जाधव यांचा समावेश आहे.

🤙 8080365706