
कोल्हापूर : गांधीनगर बाजारपेठेतील वृक्ष रक्षण व संवर्धन करण्यासाठी व जे काही जण दुकानासमोरील वृक्ष कचरा पेटवून नष्ट करतात अशा पर्यावरण द्रोही लोकांवर कायदेशीर कारवाई करावी.जे वृक्ष सध्या डौलाने उभे आहेत त्यांची गणना करून,त्यावर क्रमांक टाकून संवर्धनाची जबाबदारी निश्चित करण्याबाबत करवीर शिवसेने कडून जोरदार निदर्शने देण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठ म्हणून गांधीनगरची ओळख आहे. तावडे हॉटेल ते रुकडी बंधारा हा प्रमुख जिल्हा मार्ग या बाजारपेठेतून जातो. हा रस्ता नव्याने करण्यात येत आहे. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याला अडसर करणारी झाडे तोडली आहेत. काही झाडे परवाना देण्याच्या अगोदर तोडली आहेत तर काही झाडे वन खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर तोडली आहेत. त्यामुळे प्राणवायू पुरवणाऱ्या वृक्षांची संख्या अत्यल्प झाली आहे. जे वृक्ष आता शाबूत आहेत त्याचे संवर्धन करणे पर्यावरण दृष्ट्या अत्यंत निकडीचे आहे. पण काही दुकानासमोरचे वृक्ष कचरा पेटवून नष्ट करण्याच्या काही जण प्रयत्न करत आहेत. त्यांना पर्यावरणाबद्दल कोणतेही सोयर सुतक नाही. बाजारपेठेत विविध राज्यातून ग्राहक व व्यापारी येत असतात. त्यावेळी प्रचंड गर्दीचे हे ठिकाण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वृक्ष तोडल्यानंतर परिसरातील तापमान वाढले आहे. पर्यावरणाला बाधा पोहोचली आहे. वृक्षसंपदा अत्यल्प झाली आहे. लोकांना उष्म्याने हैराण केले. म्हणून जे उर्वरित वृक्ष आहेत त्याची निगा व संवर्धन करण्याची जबाबदारी वन खात्याची आहे. त्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. जे वृक्ष शिल्लक आहेत त्यांची गणना करून त्यावर वन खात्याने क्रमांक टाकावेत. या वृक्षांच्या संवर्धनासाठी ज्याच्या दुकानासमोर वृक्ष आहे त्या दुकानदाराने त्या वृक्षाचे संवर्धन करावे, अशी जबाबदारी निश्चित करावी. असे करून सुद्धा कचरा पेटवून अगर ऍसिड टाकून वृक्ष नष्ट केल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसे झाल्यास पर्यावरणाला बाधा पोहोचणार नाही. उष्मा वाढणार नाही. पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.ही उपाय योजना ताबडतोब करण्यात यावी. त्यासाठी नागरिक व शिवसेनेसह विविध पक्ष संघटना, पर्यावरण प्रेमी लोक योगदान देण्यास तयार आहेत. त्यांच्या मदतीने वृक्ष संवर्धन करावे. वृक्ष संवर्धनासाठी स्थानिक समिती नेमावी. अशी उपाय योजना ताबडतोब करावी अन्यथा वृक्ष नष्ट होतील. आपल्याकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास शिवसेनेला जन आंदोलन करावे लागेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची असेल. असे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले वन खात्याचे करवीरचे लेखापाल मारुती पाटील यांनी आपल्या निवेदनाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊन ईथून पुढे तावडे हॉटेल रुकडी बंधारा सदर रोडवर असणारी झाडे तोडण्यास आम्ही परवानगी देणार नाही व रस्ता रुंदीकरण होऊन जी झाडे राहिली आहेत त्याचे संवर्धन होण्याबाबत आम्ही प्रयत्न करू असे वन अधिकारी बोलताना म्हणाले राजू यादव यांनी जर का आपण परत रस्त्यालगतशी झाडे तोडण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा दिला यावेळी मारुती पाटील वनक्षेत्रपाल करवीर लेखापाल यांना निवेदन देण्यात आले
यावेळी उपस्थित करवीर तालुका प्रमुख राजू यादव, फेरीवाला संघटना तालुका अध्यक्ष कैलास जाधव, युवा सेना तालुका अध्यक्ष योगेश लोहार, फेरीवाला संघटना उपतालुकाध्यक्ष बाळासाहेब नलवडे, विभाग प्रमुख दीपक पोपटानी, शाखाप्रमुख दीपक अंकल, उपशाखाप्रमुख सुनील पारपाणी, अजित चव्हाण, किशोर कामरा, जितू चावला आदि शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
