आमदार बच्चू कडू नाराज….

अमरावती : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान आता आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.

मी मंत्रिपदासाठी थोडी बोलत आहे. एकंदरीत या व्यवस्थेमध्ये कोण कसं अडचणीत येत आहे. ते मी सांगत आहे. शेवटी काही मर्यादा असतात. किती वेळ थांबायचं, किती वेळ सहन करायचं याच्याही काही मर्यादा आहेत. जर मर्यादा तुटल्या तर कोणीच कुणाच नसतं, असं म्हणत बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.मी जे काही करेल ते मीडियाला सांगून करणार नाही. आतमधून सर्व शिजू द्यावं लागतं.व्यवस्थित पाहू आणि मग योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ. मग तुम्हाला माहित पडेल की मी काय करू शकतो, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.

🤙 8080365706