
सेनापती कापशी : सेनापती कापशी ची माती ही गुणवत्तेची खाण आहे या मातीतच असलेल्या रानडे विद्यालयाने शालांत परीक्षेत अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणले.त्यांच्या जीवनात त्यांनी यशाचे शिखर गाठले. असे प्रतिपादन प्रा. जयकुमार देसाई यांनी केले .
येथील न्यायमूर्ती रानडे विद्यालयात आयोजित मुख्याध्यापिका सविता अनिल कुलकर्णी यांच्या सेवानिवृत्ती च्या कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले आपल्या ३४ वर्षाच्या सेवेत शिक्षण प्रसारक मंडळाने दिलेली जबाबदारी यशस्वी रीत्या पेलली .आपल्या सेवा काळात शिस्तप्रिय काम करत गावकरी व माजी विद्यार्थी यांच्याशी स्नेहबंध जोपासला . तो वाखणण्या सारखा आहे.
सत्काराला उत्तर देताना सौ कुलकर्णी म्हणाल्या की शिक्षणमहर्षी एम आर देसाई आपले सासरे सातविराप्पा कुलकर्णी यांनी दिलेला वसा सांभाळण्याचे कार्य आपण केले . दहावी निकालात आपली शाळा तालुक्यात प्रथम आली . माजी विद्यार्थ्यांची मोट बांधून शाळा विकासात योगदान दिल्याचे समाधान वाटते.
प्रास्ताविक एस डी साठे यांनी केले . विलास अनुसे, ईश्वरा कुंभार यांनी मनोगते व्यक्त केली . चंद्रकांत धामणे , एस के भोसले , एम्.डी पाटील, आर आर पाटील, एम बी रूग्गे , एस आर पाटील ,दत्तात्रय वालावलकर , अनिल कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते . या कार्यक्रमास पंचक्रोशीतील पालक विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते .निसार मुल्ला यांनी सूत्रसंचलन केले .
