कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू

कोल्हापूर : जिल्ह्यात  मागील काही महिन्यांमधील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाकडून बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. आज (5 जुलै) सकाळीपासून जिल्ह्यात बंदी आदेश लागू झाला असून 19 जुलैपर्यंत हा बंदी आदेश लागू असेल.

त्यामुळे कलम 37 (3)  अन्वये जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमणेस, मिरवणुका काढणे व सभा घेणे, याला बंदी असेल. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा इतर शस्त्रात्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन याला बंदी असेल. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे. ज्यामुळे सभ्यता अथवा नितिमत्ता यास धक्का पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे यालाही बंदी असेल.

🤙 8080365706