
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील वांद्रे भागातील एमईटी मैदानावर बैठक बोलावली आहे. यात बोलताना आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवार यांचा झाला, असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे गहिवरले.

अजित दादांवर आतापर्यंत बरीच टीका झाली. त्यांनी किती अपमान सहन केले. पण ते अपमान त्यांनी त्यांच्या सावलीलाही कळू दिलं नाही. प्रत्येक वेळेस त्यांच्यावर टीका झाली. पण त्यांनी साहेबांसाठी सगळं सहन केलं, असंही धनंजय मुंडे म्हणालेत.
