
मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो बॅनर्स, कार्यालय अथवा अन्य ठिकाणी वापरण्यावरून वाद निर्माण झाला आहे. यावर खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझे फोटो वापरू नका, असं शरद पवार यांनी अजित पवार गटाला थेट सुनावलं आहे.

राष्ट्रवादीतील बंडखोर गटाविरोधात शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवारांनी अजित पवार गटाला सुनावलं आहे. माझ्या विचारांशी द्रोह करणाऱ्यांनी माझा फोटो वापरू नये. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या पक्षानेच केवळ माझा फोटो वापरावा, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत.
