डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी काही व्यायाम

आजकाल कमी वयात लोक डोळ्यांवर चश्मा लावत आहेत. चश्मा लागण्याचं मूळ कारण डोळ्यांची व्यवस्थित काळजी न घेणं हे असू शकतं. पोषक तत्वांची कमतरता हे अनुवांशिक कारण असू शकतं. डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी काही व्यायाम प्रकार करू शकता.

डोळे निरोगी ठेवण्याचा हा एक अतिशय सोपा आणि ट्रेंडी मार्ग आहे. नेत्ररोग तज्ज्ञ देखील हे करण्याची शिफारस करतात. या 20-20-20 नियमात, तुम्हाला फक्त लॅपटॉपवर काम करताना दर 20 मिनिटांनी ब्रेक घ्यावा लागेल आणि तुमच्यापासून किमान 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पाहावे लागेल. या व्यायामामुळे दृष्टी तीक्ष्ण होण्यास मदत होते.

पापण्या मिचकावल्याने डोळ्यांवरील ताण  दूर होतो. 2 सेकंद डोळे बंद करा, नंतर उघडा आणि 5 सेकंद सतत ब्लिंक करा. हे किमान 5-7 वेळा पुन्हा करा. असे केल्याने डोळ्यांचा थकवा आणि लाल डोळ्यांची समस्या दूर होईल.

नेत्र तपासणीसाठी नियमितपणे डॉक्टरांकडे जा. लहान मुलांचे डोळे लवकर खराब होतात, अशा स्थितीत त्यांची नियमित नेत्र तपासणी करणे आवश्यक आहे.

🤙 8080365706