
वर्धनगड : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या खटाव तालुक्यातील वर्धनगड किल्ल्यावर एका दर्ग्याभोवती वन विभागाच्या हद्दीत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम आज हटविण्यात आले.

कमालीची गुप्तता पाळत वन विभागाने दर्गा परिसरातील वाढीव अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई केली. यावेळी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.वर्धनगडावर असलेल्या दर्ग्याभोवती वनविभागाच्या हद्दीत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटविण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. आज मंगळवारी पहाटे पोलिस बंदोबस्तात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दर्ग्याभोवतालचे बांधकाम हटविण्याची कारवाई सुरु केली.
