नाशिक मधील वातावरण तापलं

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून नाशिकमधील राष्ट्रवादी कार्यालयाचा ताबा घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यालयात कोणालाही घुसू देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिलीप खैरे आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी घेतली आहे. नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. अजित पवार यांनी पक्षातून बंडखोरी केली. प्रफुल्ल पटेल यांनी देखील अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. आता प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या गौप्यस्फोटानं खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादी भाजपसोबत युती करणार होती. राष्ट्रवादीच्या 51 आमदारांनी शरद पवार यांना पत्र दिलं होतं असा खळबळजनक दावा पटेल यांनी केला आहे.

🤙 8080365706