राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत : अजित पवार

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलाथपालथ सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केलय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट सोबत असल्याचा अजित पवार यांचा दावा आहे.

सध्या अजित पवारांसोबत प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील हे नेते मंचावर एकत्र दिसतायत. अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदार, नेत्यांनी आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात ही राजकीय लढाई आणखी तीव्र होईल. जित पवार यांनी जयंत पाटील यांना हटवून त्यांच्याजागी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. त्याशिवाय प्रतोद, प्रवक्त्याच्या नेमणूका जाहीर केल्या. शरद पवार यांच्या गटाने विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक केली आहेत. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड दोघांना अपात्र ठरवण्यासाठी अजित पवार गटाने पावल उचलली आहेत.

🤙 8080365706