
कोल्हापूर : राजकीय विरोधक आमदार हसन मुश्रीफ यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ पडल्याने ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे प्रचंड नाराज असल्याची म्हटलं जात आहे.

समरजितसिंह घाटगे हे हसन मुश्रीफ यांनी शपथ घेतलेल्या दिवसापासूनच नाराज आहेत. यासंदर्भात घाटगे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाराजीही व्यक्त केली आहे. मात्र घाडगे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला अपयश आले आहे.
समरजितसिंह घाटगे हे मोठ्या प्रमाणात नाराज असल्याची माहिती मिळत आहे. मुश्रीफ यांनी शपथ घेण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्यांना सोबत घेऊ नका असे सांगितले होते. गेल्या 10 वर्षांपासून मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यात राजकीय संघर्ष सुरु आहे. समरजितसिंह घाटगे यांनी अपक्ष हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
