तो पक्ष सत्तारुढ पक्ष म्हणून की विरोधी पक्षात काम करत आहे? : राहुल नार्वेकर

मुंबई : आपल्याकडे सर्वाधिक आमदार आणि खासदारांचं बहुमत आहे, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आला आहेपण या आमदारांची यादी आणि संख्या विधानसभेच्या अध्यक्षांपर्यंत अद्याप पोहोचलेली नाही, असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधी पक्षनेत्याचा नेमणूक करण्याचा अधिकार हा पूर्णपणे विधानसभा अध्यक्षांना आहे. हा अधिकार बजावत असताना विधानसभेचे या संदर्भात काही नियम आहेत. त्याचप्रमाणे संविधानातही या विषयी तरतुदी आहेत. या सगळ्यांचा विचार करुन, संख्याबळ बघून योग्य निर्णय घ्यावा लागेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलत असताना तो पक्ष सत्तारुढ पक्ष म्हणून काम करत आहे की विरोधी पक्षात काम करत आहे? याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे”, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा या सगळ्या बाबींचा विचार करुन, कायदेशीर तरतुदींचा विचार करुन योग्यरित्या आणि योग्य वेळेला घेतला जाईल”, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. “माझ्याकडे आतापर्यंत अनेक निवेदनं आली आहेत. त्यापैकी एक अपात्रतेची याचिका महाराष्ट्राचे विधानसभेचे सदस्य जयंत पाटील यांनी केली आहे, त्याची प्रत माझ्याकडे आली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या निवासस्थानी ही प्रत दिलीय. ती मला प्राप्त झालेली नाही”, असंही नार्वेकरांनी सांगितलं.

🤙 8080365706