सामाजिक बांधिलकीतुन पत्रकारांच्या पाल्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहू; मिलिंद धोंड

कोल्हापूर : पत्रकार हा समाजाचा आरसा आहे.त्यांच्या पाल्यांच्याही अंगी कौशल्ये असतात.स्वतःच्या कामाचा व्याप सांभाळत आपल्या पाल्यांचा शैक्षणिक विकास करण्याची मोठी जबाबदारी पत्रकार आणि त्यांचे कुटुंब पार पाडत असतात.आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून,पाल्यांनी आपली प्रगती आणि ध्येय साध्य करावे असे आवाहन एनजीओ कम्पँशन – २४ व वुई केअर ग्रुपचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी केले.तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांच्या पाल्यांच्या शैक्षणिक साहित्य मदतीसाठी सदैव तत्पर राहू अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली.

कोल्हापूर प्रेस क्लब आणि एनजीओ कम्पँशन – २४ च्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कोल्हापूर प्रेस कार्यालयात झालेल्या याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर प्रेस क्लब चे अध्यक्ष शीतल धनवडे,दैनिक क्रांतीसिंहच्या संपादिका सुनंदा मोरे,एस.न्युजचे संपादक कृष्णात जमदाडे,अजित साळोखे,देवेंद्र सामंत आदी उपस्थित होते.दहावी तसेच बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळालेल्या पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव करताना,यावेळी केजी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट मिलिंद धोंड यांच्या हस्ते देण्यात आली.याप्रसंगी कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्याची माहिती देताना,सामाजिक भावनेतून पत्रकारांच्या पाल्यांचा शालेय साहित्य देऊन गौरव करणारे मिलिंद धोंड यांचे विशेष आभार प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी मानले.तसेच यापुढे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना बोलावून पत्रकारांच्या पाल्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा व त्यामाध्यमातून अशा मुलांच्या शैक्षणिक कौशल्याचा विकास करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.यावेळी जेष्ठ पत्रकार श्रीमती सुनंदा मोरे यांनी धकाधकीच्या जीवनात कसातरी वेळ काढून पत्रकार कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असल्याकडे लक्ष वेधले.पत्रकारांच्या मुलांनी शैक्षणिक जीवनात कष्ट घेऊन प्राविण्य मिळवावे आणि आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला यश प्राप्ती मधून नावारूपाला आणावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी एसपीएन न्यूज चॅनेल चे संपादक कृष्णात जमदाडे यांनीही उपस्थित पाल्यांना मार्गदर्शन केले.संचालक समीर मुजावर यांनी सुत्रसंचलन केले.यावेळी सचिव बाबुराव रानगे,खजानिस पी.ए. पाटील,संचालक सुखदेव गिरी,मिथुन राजाध्यक्ष, सचीन सावंत,विजय केसरकर,शुभांगी तावरे, श्रद्धा जोगळेकर,नयन यादवाड,अमरसिंह पाटील, सतेज औंधकर,बाळासाहेब उबाळे,बाळासाहेब पाटोळे,संपत नरके,ज्ञानेश्वर साळोखे,निलेश शेवाळे,दयानंद जिरगे,महेश कांबळे,श्रीकांत पाटील आदीं पत्रकार त्यांचे पाल्य आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.* साडेतीन हजारांहून अधिक मुलींना दत्तक एनजीओ कम्पँशन-२४ या सामाजिक संस्थेची ओळख करून देताना,या संस्थेच्या वतीने आतापर्यंत ३ हजार ६०० हुन अधिक मुलींना दत्तक घेण्यात आले असून,समाजातील विविध घटकांचा विश्वास आणि मदतीने त्यांना मदत कधी कमी पडली नाही.या मुलींना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी सर्व ते सहाय्य केले जाणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

🤙 8080365706