
मुंबई : रविवारचा दिवस हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारा दिवस होता. असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

एकीकडे समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यमूखी पडलेल्या प्रेतांवर अंत्यसंस्कार सुरू होते. तर दुसरीकडे हा शपथविधी सुरू होता. त्यामुळे हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस होता, असे नाना पटोले म्हणाले.
