
सांगली : सांगली जिल्ह्यातील एकाही आमदाराचा अजित पवार यांच्या बंडाला पाठिंबा नाही. आर आर पाटील आबांना एक सामान्य कार्यकर्त्यापासून ते गृहमंत्रीपदी बसवण्याची दानत शरद पवार यांच्यात होती. ती संधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. त्यामुळे शरद पवार अडचणीत असताना त्यांना पाठिंबा देण्याचा आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा आम्ही साऱ्यांनी निर्णय घेतला आहे, अशा शब्दांत दिवंगत आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सामान्य माणसाला सत्तेच्या प्रवाहात आणण्याचे मोठं काम केलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा शरद पवारांच्या बरोबरच राहणार असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यात सर्वात मोठा पक्ष बनेल,” असा विश्वास माजी मंत्री आर आर पाटील यांची सुपुत्र रोहित पाटील यांनी व्यक्त केला.
