वाहत्या कालव्यात ट्रॉली पडून महिलांचा मृत्यू

सातारा : ट्रॉली वाहत्या कालव्यात पडून कारंडवाडी (ता. सातारा) येथील चार महिलांचा मृत्यू झाला, तर तिघी जण जखमी झाल्या.

त्यातील एकीची प्रकृती चिंताजनक आहे. आज सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.शेतातील काम आटोपून घराकडे परतणाऱ्या या महिलांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.अरुणा शंकर साळुंखे (वय ५८), उल्‍का भरत माने (वय ५५), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय ६५), लीलाबाई शिवाजी साळुंखे (वय ६०, सर्व रा. कारंडवाडी) अशी मृत महिलांची नावे आहेत.

🤙 8080365706