महापालिकेने टेंडर जाहीर केल्यावरच काम सुरु करणार: टिप्परचालकांचा पवित्रा

कोल्हापूर : शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर वाहनाचे वाहनचालक कंत्राटीपद्धतीने महापालिकेला सेवा देतात. प्रिंसिपल एम्प्लॉयर म्हणून टिप्पर चालकांना किमान वेतन देणे महापालिकेस बंधनकारक असून देखील त्याची अंमलबजावणी करण्यात येत नव्हती. किमान वेतनच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखाली गेल्या मार्च पासून साततत्याने आंदोलन सुरु होते. अखेर तत्कालीन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महापालिकेने सहा जून शिवराज्याभिषेक दिनादिवशी किमान वेतन लागू करण्यासाठी नवीन टेंडर जाहीर करू असे आश्वासन दिले होते. तसेच एप्रिल 2023 पासून किमान वेतनाचा फरक देखील जमा करावा अशी मागणी चालकांकडून केली गेली होती. परंतु याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ होत असल्याने टिप्परचालकांनी आज दुपारपासून (शनिवार) बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.

महापालिकेने टेंडर जाहीर करण्यासाठी तांत्रिक कारणे देत अनेकवेळा मुदतवाढ मागितली होती. परंतु दिलेल्या तारखेत अंमलबजावणी होत नसल्याने अखेर बेमुदत बंद जाहीर केला. शनिवारी दुपार पासून दोन्ही कंत्राटदारांकडे काम करत असलेले सर्व टिप्परचालक काम बंद करणार असून टेंडर जाहीर होऊ पर्यंत कामावर परत न येण्याचा निर्णय टिप्परचालकांनी घेतला असल्याचे आप चे कार्याध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.नागरिकांना बंदचा त्रास होऊ नये यासाठी याआधी अनेकवेळा टिप्परचालकांनी संयमाची भूमिका घेऊन काम सुरु ठेवावे यासाठी आप ने कायम पुढाकार घेतला. परंतु महापालिकेने तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असल्याचे देसाई यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले.

🤙 8080365706