ग्रॅव्हिट्स फाउंडेशनचा ‘गुड टच बॅड टच’ उपक्रम बालकल्याण व शिक्षण विभागाने राज्यभर राबवावा; डॉ. नीलम गोऱ्हे

कोल्हापूर : “बालकांचे आरोग्य, विकास, सुरक्षितता, शिक्षण यासाठी युनिसेफ व भारत सरकार यांच्यात सहकार्य करार झाला आहे. याअंतर्गत बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी उपयुक्त ठरलेला ग्रॅव्हिट्स फाउंडेशनचा ‘गुड टच बॅड टच’ उपक्रम बालकल्याण व शिक्षण विभागाने राज्यभर राबवावा,” अशी सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केली.

बाल न्याय अधिनियम आणि बालकांच्या सुरक्षिततेचे इतर कार्यक्रम मराठीमधून उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या संस्थापिका-अध्यक्षा उषा काकडे यांच्या पुढाकाराने युनिसेफ व ग्रॅव्हिटस फाउंडेशनतर्फे ‘बाल आरोग्य, विकास व त्यांचे अधिकार’ या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनावेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या परिषदेला युनिसेफच्या महाराष्ट्र प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, ‘सिंबायोसिस’च्या संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, दिग्दर्शिका फराह खान, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, बालनाट्य दिग्दर्शक संजय हळदीकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. अमिता फडणीस, ऍड. दिव्या चव्हाण, ट्रान्सजेंडर ॲक्टीविस्ट लक्ष्मीनारायण त्रिपाठी, महिला व बालकल्याण उपायुक्त राहुल मोरे, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता, सामाजिक कार्यकर्त्या जुगनू गुप्ता, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी विचार मांडले. बालकांसाठी काम करणारे कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते

🤙 8080365706