
मुंबई: राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयासह राज्यात ईडीने 14 ठिकाणी छापेमारी केलीये.

10 वर्ष जुन्या 1 हजार कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचा तपास ईडीकडून केला जात असून बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाती उघडून मोठ्याप्रमाणात रकमा वळत्या केल्याचा ईडीला संशय आहे. या घोटाळ्यात बँकेचे अधिकारी असल्याचा आरोप आहे. तसंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित ही बँक असल्याचा आरोपही केला जातोय. मात्र याबाबत जयंत पाटलांकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेल नाही. ते आता काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
