
मुंबई : राज्य सरकारने परिवहन आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारीत आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे.

त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी संवर्गातील नवीन पदांना मंजूरी मिळाली आहे. यामुळे राज्यातील एकूण नऊ उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या दर्जात वाढ करुन त्यांचे प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे आता वाहन चालकांना त्यांच्या वाहनांसंदर्भातील कामासाठी मुख्य आरटीओत जाण्याचा त्रास वाचणार आहे.
कोणत्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर केले आहे ते पाहा..
राज्यातील परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्या प्रस्तावानूसार 1) पिंपरी-चिंचवड, 2) जळगाव, 3) सोलापूर, 4 ) अहमदनगर, 5) वसई ( जि. पालघर ), 6) चंद्रपूर 7) अकोला, 8) बोरीवली ( मुंबई ), 9) सातारा येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या दर्जात वाढ करण्यात येऊन त्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात त्यांचे रुपांतर करण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे.
