
नाशिक : नाशिक रोड रेल्वे स्थानकावर 19 वर्षाच्या विवाहित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.

गुजरात मधील नवसारी येथून ही विवाहिता आपल्या बहिणीकडे आली होती. रेल्वेने मध्यरात्री ती रेल्वे स्थानकावरच थांबली होती. सकाळ झाल्यावर घरी जाण्यासाठी बस मिळतील म्हणून तिने रेल्वे स्थानकावर थांबण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याचवेळी मदतीच्या बहाण्याने विवाहितेला अज्ञात स्थळी नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर या दोघांना नाशिक रोड पोलिसांनी (Nashik Police) अटक केली आहे.नवसारी येथून नाशिकमधील आपल्या बहिणीकडे ही विवाहिता आली होती. पण मध्यरात्र झाल्याने ती रेल्वेस्थानकावरच थांबली होती. त्याचवेळी दोघांनी मदतीच्या बहाण्याने तिला चेहडी शिव परिसरात तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. अत्याचारानंतर विवाहितेला मारहाण देखील करण्यात आली होती. त्यानंतर विवाहितीने तिथून पळ काढत पोलीस ठाणे गाठले आणि आपली तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपास करत आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी एकजण रेल्वे स्थानकावरील पाणी विकण्याचे काम करतो तर दुसरा रिक्षाचालक आहे.
