
कोल्हापूर : यंदा मान्सूनची चाल चक्रीवादळामुळे मंदावली आहे. पण २४ जूनपासून मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

२३ ते २९ जूनदरम्यान मध्य भारतात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर ३० जून ते ६ जुलैदरम्यान मान्सून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला असून, अनुकूल हवामानामुळे शुक्रवारपासून दक्षिण कोकणात पाऊस जोर पकडणार आहे.
