
खाण्यापिण्याच्या योग्य सवयींच्या मदतीने डोळ्यांचा कोरडेपणा कमी करता येऊ शकतो. ते पदार्थ कोणते, हेही जाणून घेऊया.

हाय सोडिअम असलेले पदार्थ हे आपल्या शरीरातील नैसर्गिक पाण्याची पातळी कमी करू शकतात. सॉल्टेड नट्स, वेफर्स आणि चिप्स यासारख्या पदार्थांचा हाय सोडिअम स्नॅक्समध्ये समावेश होतो. असे स्नॅक्स खाल्ल्याने शरीरातील पाणी कमी होते आणि लगेच तहान लागते. त्याचा परिणाम डोळ्यांवरही होतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात हाय सोडियमयुक्त स्नॅक्स घेत असाल तर त्याचा तुमच्या एकूण आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
डोळे कोरडे होण्यामागे दारू हे सर्वात मोठे कारण मानले जाते. जेव्हा तुम्ही भरपूर मद्य पीता किंवा मद्याचे प्रमाण जास्त असलेले पेय सेवन करता तेव्हा त्याचा तुमच्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. मद्य प्यायल्यामुळे तुमच्या शरीरात पाणी कमी होते आणि डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. खूप जास्त दारू प्यायाल्याने डोळ्यातील ओलावा हळूहळू कमी होत जातो. तसेच डोळ्यात अश्रू निर्माण होण्याची प्रक्रिया प्रभावित होते.
डोळे बऱ्याचा दिवसांपासून कोरडे होत असतील तर डॉक्टरांना भेटून योग्य उपाय करावेत.– स्क्रीनचा वापर कमीत कमी करता. टीव्ही असो किंवा मोबाईल, थोड्या वेळाने ब्रेक घेऊन थोडा वेळ चालावे.– भरपूर पाणी प्यावे, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता कधीच भासणार नाही नये. प्रत्येकाने दिवसातून किमान 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.– कोरडेपणामुळे डोळ्यांना खूप त्रास होत असेल तर थंड कापडाची पट्टी डोळ्यांवर ठेवावी. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.
