
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष भावंडांशी संबंध दुरावणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत संघर्षाचे प्रसंग घडतील.
मिथुन आज कायद्याच्या नियमाच्या विरुद्ध काम केल्यास शिक्षा होण्याची शक्यता राहिल. शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. नोकरीत विरोधक कारवाया करयाची संधी दवडणार नाहीत.
वृषभ बौद्धिक क्षेत्रात आपली प्रतिष्ठा उंचावेल. नोकरी रोजगारात आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. आपल्या अंगीभूत कलागुणांना चांगले वातावरण राहिल.
कर्क नवीन उपक्रम हाती घ्याल. मोठ्या व्यक्तींचा सहवास लागेल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकेल.
कन्या नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल.
तूळ आर्थिक उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता राहील. दुसऱ्याला जामीन राहू नका अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे.
धनु काहीसा अडचणीत आणणारा त्रासदायक दिवस ठरेल. पती पत्नीमध्ये बेबनाव गैरसमज होणार नाही याविषयी काळजी घेणे योग्य ठरेल.
वृश्चिक नोकरीत सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. मोठ्या व मान्यवर व्यक्तींच्या गोठाभेटी होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.
मकर नोकरीत प्रमोशन व वेतनवाढ होण्याची शक्यता आहे.आकस्मिक लाभ होतील. विरोधकावर मात करू शकाल.
कुंभ रोजगारात स्वतःच्या विवेक बुद्धीने निर्णय घ्या. बढतीची शक्यता आहे. नवीन संधी नवीन मार्ग सापडतील.
मीन नोकरीत अनुकुल योग आहे. देवधर्म व धार्मिक स्थळांना भेट दयाल. नोकरीनिमित्त दुरवरचे प्रवास घडतील.
